समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीबरोबरच सामाजिक जबाबदारीचे दायित्व देखील निभावणे तितकेच महत्त्वाचे आहे. ह्या विचारांच्या पार्श्वभूमीवर सद्गुरू श्री चैतन्यसवरूप उर्फ सद्गुरू ती. अण्णा व सद्गुरू श्री लक्ष्मीसवरूप उर्फ सद्गुरू ती. आईंच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ सेवा मंडळातर्फे विविध वैद्यकीय सेवा आयोजित केल्या जातात. त्यातील एक सेवा म्हणजे नियमित वैद्यकीय तपासणी शिबिरांचे आयोजन.
बरेचवेळा रोगाचे निदान वेळेत न झाल्याने रोग बळवतो. ह्याकरिता नियमित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. हे विचारात घेऊन मंडळ वैद्यकीय शिबिरांचे नियमित आयोजन करते ज्यात डॉक्टर्स, प्रॅक्टिशनर्स, मेडिकलचे (वैद्यकशास्त्र) विद्यार्थी मोफत सेवा देतात.
ही वैद्यकीय तपासणी शिबिरे नांदिवली मठामध्ये तसेच भावी चिल्ड्रेन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर प्रकल्पाच्या जागेत घेतली जातात. जवळपासच्या खेड्यातील लोक या शिबीराचा लाभ घेतात. डोंबिवलीतील शाळेतील विद्यार्थ्यांनाही ह्या वैद्यकीय तपासणी शिबिरांना बोलवले जाते.
आजपर्यंत आयोजन केलेली काही वैद्यकीय तपासणी शिबिरे:
- थॅलेसेमिया मायनार (रक्तदोष) तपासणी वैद्यकीय शिबिर.
- मधुमेह तपासणी शिबिर.
- रक्तदाब तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर.
- लहान मुलांसाठी शारीरिक तपासणी शिबिर, सकस आहार व आरोग्य शिबिर.
- नंदकिशोर संस्कार केंद्रातील नंदकिशोरांसाठी दंत,नेत्र,कर्ण चिकित्सा शिबिर; शारीरिक तपासणी शिबिर
- आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांसाठी बालरोगतज्ञांचे विशेष शिबिर
- हीलिंग उपचार शिबिर - तज्ञ श्री. एस्. पोतनीस
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ (रजि.) डोंबिवली पूर्व, या संस्थेने आयोजित केलेल्या "कै. नाना काका देशपांडे स्मृती वैद्यकीय व्याख्यानमाला " अंतर्गत आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचा तपशील
- रविवार दिनांक २२ जून २००८ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिर, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत 'रक्तदाब व मधुमेह ' या आजारांवर डोंबिवलीतील एक प्रख्यात डॉक्टर सौ. मेधा ओक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानास एकूण ६९ श्रोते उपस्थित होते.
- रविवार दिनांक २७ जुलै २००८ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिर, रामनगर, डोंबिवली पूर्व येथे सकाळी ९.०० ते ११.०० या वेळेत ' मूळव्याध चिकित्सा ' या विषयावर वैद्य साने क्लिनिक तर्फे डॉ. ओंकार चौधरी यांचे व्याख्यान झाले. धुवांधार पाऊस कोसळत असूनही या व्याख्यानास तब्बल ५२ श्रोते उपस्थित होते.
- रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २००८ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिर येथे सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत 'कॅन्सर' या आजारासंबंधी डोंबिवलीतील एक प्रख्यात डॉक्टर श्री अनिल हेरूर यांचे व्याख्यान व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भरपूर पाऊस असूनही या चर्चासत्रात ३२ श्रोते सामील झाले होते
- रविवार दिनांक २८ सप्टेंबर, २००८ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत सौ.वर्षा कोल्हटकर, यामध्ये पुष्पौषधी या विषयावर व्याख्यान झाले
- रविवार दिनांक २३ नोव्हेंबर, २००८ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिर येथे सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत प्रख्यात आयुर्वेदाचार्य वैद्य विनय वेलणकर यांचे व्याख्यान झाले. या व्याख्यानास ४३ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २८ डिसेंबर २००८ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ.श्रीरंग श्रीखंडे यांचे 'मनोविकारांचा मागोवा ' या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानास ३७ श्रोत्यांनी हजेरी लावली
- रविवार दिनांक २५ जानेवरी२००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिर येथे सकाळी १०.३०. ते १२.०० या वेळेत श्री राहुल महादार आणि सौ धनश्री महादार यांचे 'अत्याधुनिक पद्धतीने दुर्बिणीतून शस्त्रक्रिया' व 'कान नाक घसा यांचे आज़र व उपचार पद्धती ' या विषयांवर व्याख्यानातून मार्गदर्शन केले व श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले. या व्याख्यानास २६ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २२ फेब्रुवारी २००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध वैद्य श्री कौस्तुभ विष्णू गद्रे यांचे ''आहार आणि आरोग्य'' या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानाचा ३० श्रोत्यांनी लाभ घेतला
- रविवार दिनांक २२.०३.२००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत डोंबिवलीतील सुप्रसिद्ध युरॉलॉजिस्ट डॉ.श्री. नितीन दांडेकर यांचे 'मूत्रपिंडांचे विकार व डायलेसिस' या विषयावर व्याख्यान झाले. या अनुषंगाने ३३ श्रोते लाभ घेण्यासाठी उपस्थित होते
- रविवार दिनांक २६.०४.२००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत डोंबिवलीतील प्रसिद्ध नेत्र शल्य विशारद सौ अनघा हेरूर यांचे 'मोतीबिंदू, काचबिंदू व मधुमेहामुळे येणारे अंधत्व ' या विषयांवर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. या व्याख्यानास ४८ श्रोते उपस्थित होते
- वैद्यकीय शिबिर:- रविवार दिनांक २४.०५.२००९ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, नांदिवली मठ, नांदिवली येथे प्रख्यात नेत्र शल्य विशारद सौ अनघा हेरूर- (M .S .ophth );FCPS :DOMS DNB ,MBBS , यांचे मार्फत शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात एकूण ७२ शिबिरार्थींनी सहभाग घेतला. त्यापैकी काही जणांना काचबिंदू, मोतीबिंदू, पडद्याची शस्त्रक्रिया व चष्म्याचा नंबर यासंबंधी पुढील तपासणी आवश्यक होती. त्या त्यांना मठातर्फे सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच काहींना सवलतीच्या दरात आवश्यक गोळ्या, औषधे उपलब्ध करून देण्यात आल्या
- रविवार दिनांक २७.०९.२००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत सौ कुमुद बेदरकर (MAMD ) यांनी 'नैसर्गिक उपचार पद्धती ' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. या वेळी २४ श्रोत्यांनी सहभाग घेतला
- रविवार दिनांक २४.११.२००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत 'संधिवात - वाढती समस्या ' या विषयावर डॉ. मंगेश देशपांडे यांचे व्याख्यान झाले. या वेळी २८ श्रोते उपस्थित होते.
- रविवार दिनांक २४.११.२००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत 'संधिवात - वाढती समस्या ' या विषयावर डॉ. मंगेश देशपांडे यांचे व्याख्यान झाले. या वेळी २८ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २७ डिसेंबर, २००९ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० ते १२.०० या वेळेत वैद्य श्री महेश म ठाकूर, आयुर्वेदाचार्य (मुंबई), यांचे 'आम्लपित्त - समस्या व उपचार ' या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यावेळी २९ श्रोत्यांनी त्याचा लाभ घेतला
- रविवार दिनांक २४ जानेवारी, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डॉ.श्री नितीन जोशी (BDS - Dental Surgeon) यांनी 'आपले दात - आपले आरोग्य ' या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी २२ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २८ मार्च, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डॉ.सौ.प्रिया अभिजित हर्डीकर यांनी 'रजोनिवृत्ती संदर्भ ' हा महिलांसाठी उपयुक्त विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ३३ श्रोत्यांमध्ये महिलांची संख्या जास्त होती
- रविवार दिनांक २३ मे, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डॉ.श्री.राजेंद्र दत्तात्रय रिसबूड यांनी 'होमिओपॅथी आणि आरोग्य ' या विषयावर मार्गदर्शन केले. या व्याख्यानास ३१ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २२ ऑगस्ट, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डॉ.सौ. स्वाती अमोल गाडगीळ यांचे 'भूलशास्त्राची ओळख ' या विषयावर व्याख्यान झाले. या कार्यक्रमास २५ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २६ सप्टेंबर, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत 'अस्थमा निदान व उपचार ' या विषयावर डॉ. सौ. संध्या सुमुख कुलकर्णी यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. यात १४ श्रोत्यांनी सहभाग घेतला
- रविवार दिनांक २४ ऑक्टोबर, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डॉ.सौ. वैशाली विकास नवरे (वाचा व श्रवणदोष तज्ज्ञ ) यांचे 'श्रवणदोष व श्रवणयंत्र' या विषयावर माहितीपर व्याख्यान झाले. या व्याख्यानास २० श्रोत्यांनी आपली उपस्थिती नोंदवली
- रविवार दिनांक २८ नोव्हेंबर, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत श्री.मनोज शशिकांत भागवत यांनी ' प्राणिक हिलिंग' या विषयावर मार्गदर्शन झाले. या व्याख्यानास ४३ श्रोत्यांचा लक्षणीय प्रतिसाद लाभला
- रविवार दिनांक २६ डिसेंबर, २०१० रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० वाजता डॉ.श्री. मकरंद रविंद्र गणपुले, एम डी पॅथॉलॉजिस्ट यांचे 'पॅथॉलॉजि एक तोंडओळख' या विषयावर आख्यान आयोजित करण्यात आले होते. सादर व्याख्यानास २५ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २७ मार्च, २०११ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत आयोजित केलेल्या डॉ. श्री. श. प्र. पटवर्धन यांचे 'शून्योपचार ' या विषयावरील व्याख्यानास २९ श्रोत्यांची उपस्थिती होती
- रविवार दिनांक २४ एप्रिल, २०११ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत ठाणे येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. श्री. श्रीकांत राजे, (MB ,DMRD ) यांचे 'मॉडर्न मेडिकल इमेजिंग ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानास २७ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २६ जून, २०११ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत श्री.दत्तात्रेय पं. चिंचणकर यांचे 'ऍक्युप्रेशर' या विषयावर उत्तम मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. या व्याख्यानास ३७ श्रोते उपस्थित होते
- रविवार दिनांक २४ जुलै, २०११ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिरात संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डॉ.भारती वसंत खांडेकर यांचे 'सुघटन शल्य चिकित्सा (Plastic Surgery )' या विषयावर उत्तम व्याख्यान झाले. या कार्यक्रमास १८ श्रोते उपस्थित होते
- शनिवार दिनांक ९ मे, २०१५ रोजी संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत गोविंदानंद श्रीराम मंदिरात डॉ.सौ.अपर्णा अनंत कर्वे यांचे ' शिवाम्बु चिकित्सा ' या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी व्याख्यानास २९ प्रेक्षकांनी उपस्थिती लावली.
- रविवार दिनांक २३ ऑगस्ट, २०१५ रोजी गोविंदानंद श्रीराम मंदिर येथे संध्याकाळी ६.०० ते ७.३० या वेळेत डोंबिवलीचे सुप्रसिद्ध अस्थितज्ज्ञ डॉ. प्रीतिश हर्डीकर (ऑर्थो सर्जन ) यांचे 'हाडांचे विविध आजार ' या विषयावर मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमास २३ श्रोते उपस्थित होते