माझी ओळख हे सौ. सुषमा भालचंद्र लिमये ( परमपूज्य सद्गुरु श्री लक्ष्मीस्वरूप उपाख्य ती. सौ. आई) यांचे आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्र दोन खंडांमध्ये लिहिले आहे. मिरजमध्ये बालपण गेलेल्या पूर्वाश्रमीच्या कुमारी शोभना भिडे यांचा श्री स्वामी समर्थ भक्त श्री. भालचंद्र दत्तात्रय लिमये (परमपूज्य सद्गुरु श्री चैतन्यस्वरूप उपाख्य ती. अण्णा) यांच्याशी विवाह झाला. माहेरी अध्यात्माची काहीच ओळख नसताना भारतीय संस्कृतीच्या अत्यंत उच्च परंपरेनुरुप लग्नानंतर पतीच्या जीवनाशी समरस झाल्या व त्यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाने प्रभावित झाल्या. पुढे ती. सौ. आई ह्या सद्गुरूंच्या शिष्योत्तम झाल्या व सद्गुरुपदाला जाऊन पोहोचल्या. त्यांचा हा प्रपंचातून परमार्थाचा प्रवास म्हणजेच "माझी ओळख".
स्वाभाविकच या ग्रंथातून परमहंस सदगुरू श्री चैतन्यस्वरूप यांचा प्रपंच, स्वामी सेवा, लोकसंग्रह,आध्यात्मिक जनजागरण आणि सांस्कृतिक व सामाजिक कार्य कसे विस्तारत गेले याची ओळख होते.
गुरुपदाला पोहोचलेल्या सत्पुरुषाच्या पत्नीने लिहिलेलं असं मराठीतील हे पहिलेच आत्मचरित्र आहे. हे आत्मचरित्र, रोजच्या जीवनात 'प्रपंच आणि परमार्थ' याचा समतोल कसा राखायचा याचं एक उत्तम उदाहरण आहे.
सद्गुरु ती. श्री भालचंद्र दत्तात्रेय लिमये यांनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे सद्गुरु प्राप्ती व सद्गुरुंचे स्वरूप जाणून घेण्यासाठी व उपासनेत दृढता निर्माण करण्यासाठी उपासकाला कुठल्या मार्गाने जावे लागते याची माहिती देणारा हा ग्रंथ आहे.
सामान्यांसाठी उपासना व सद्गुरु प्राप्ती ह्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाचे विवेचन त्यांनी सुबोध व प्रवाही अशा भाषेत,”ज्ञान योग, व दर्शन” अशा तीन भागात केले आहे.
“ज्ञान” भागात उपासनेद्वारे समजणारे उपासनेचे अंतरंग, सगुण-निर्गुण दर्शन , आत्म- प्रकाश यांचे होणारे ज्ञान याबद्दलची माहिती दिलेली आहे व तसेच ती उपासना योग्य प्रकारे करत असल्यास कुंडलिनीयोग, नाडीपरीक्षा, अज्ञातचक्रे इत्यादींचे ज्ञानही होऊ शकते. अशा अभ्यासासाठी ब्रह्मचारी साधक, गृहस्थाश्रमी साधक, संन्यासी अशा विविध स्थितीतून जाताना काय काळजी घ्यायची, हे पण त्यात सांगितले आहे.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
श्री चैतन्यस्वरूप उपाख्य तीर्थरूप अण्णा व श्री लक्ष्मीस्वरूप उपाख्य ती. सौ. आई या दोघांनी उपासकांना त्यांच्या वहीत लिहून दिलेल्या प्रवचनांचे संकलन म्हणजे हा ग्रंथ आहे. ह्या ग्रंथात एकूण १२५ प्रवचने आहेत.
प्रवचन,त्यावरील विवेचन आणि प्रवचनावर आधारित कथासार असे ह्या पुस्तकाचे स्वरूप आहे. काही प्रवचने वरवर बघता साधी वाटतात. परंतु त्या प्रवचनांचा गूढ, आध्यात्मिक, ज्ञानमय अर्थ ती. अण्णांनी विवेचनातून सांगितला आहे. तसंच तो अर्थ साध्या सोप्या बोधकथेतूनही सांगितला आहे . एकाच आशयाचे तीन वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण हे अतिशय विलोभनीय आहे.
काही ठिकाणी ती. आईंचे व ती. अण्णांचे एकाच विषयावर प्रवचन आढळते. “हृदया हृदय एक जाले” याचा प्रत्यय ही प्रवचने वाचताना येतो
प्रवचनांचे विषय जरी वेगवेगळे असले तरी सद्गुरूंचे सांगणे एकच आहे, मोह माया यापासून मनाने अलिप्त रहावे आणि स्वतःचा अहंकार आणि मोठेपणा यांचा सावंळा गोंधळ आणि अंधश्रद्धा, अस्पृश्यता याविषयीच्या कल्पना मनातून काढून, सद्गुरु चिंतनात रहावे. आपली नित्यकर्मे उरकून उरलेला वेळ सद्गुरूंनी दिलेली उपासना करणे यात घालवावा.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने प्रकाशित केलेले “चैतन्याचा नाथपंथी” हे परमहंस सद्गुरु श्री चैतन्यस्वरूप यांचे चरित्र आहे. मुंबई विद्यापीठात वरिष्ठ ग्रंथपाल म्हणून नोकरी करणारे श्री. भा.द लिमये म्हणजेच सद्गुरू ती. अण्णा उर्फ परमहंस श्री चैतन्यस्वरूप. संसारात असूनही विरक्तपणे जीवन जगणाऱ्या एका नाथपंथीयाचे हे चरित्र आहे.
सौ. सुषमा लिमये (सद्गुरु श्री लक्ष्मीस्वरूप) लिखित या ग्रंथाचे शब्दांकन सद्गुरु आज्ञेने ती. अण्णांचे परम मित्र, स्वामी सेवक श्री. मुकुंद र. आपटे यांनी केले आहे. ह्या चरित्र ग्रंथाचे दोन खंड आहेत. एकूण ८ प्रकरणात हे लेखन केले आहे. प्रत्येक प्रकरणाचे वैशिष्ट्य असे की प्रत्येक प्रकरणाच्या सुरूवातीला विषय प्रवेश व शेवटी उपसंहार लिहिला आहे. यातून संपूर्ण प्रकरणामधून उपासकांना काय शिकायचे आहे याचे मार्गदर्शन होते. हा संपूर्ण ग्रंथ वाचताना ठिकठिकाणी केवळ प्रसंग वर्णन न करता त्याचे चिंतनात्मक विवेचन दिल्याने सद्गुरुंना कसे पहावे, सद्गुरुंना कसे ऐकावे, सद्गुरु लीलांचे स्मरण कसे करावे याचे मार्गदर्शन उपासकांना होते.
पहिले प्रकरण म्हणजे सदगुरूंच्या समग्र जीवनाची एक संक्षिप्त जीवनगाथाच आहे. परमहंस सद्गुरु श्री चैतन्यस्वरूप यांच्या पूर्वजांपासून उपासना कशी चालत आली, सद्गुरूंचा जन्म, बालवयात त्यांना झालेली दर्शने, नवनाथ पोथीचे हस्तलिखित केल्यानंतर झालेली सद्गुरू भेट, त्यांनी सदगुरूंना दिलेले वचन आणि त्यानंतर सदगुरु वचनपूर्ती, मठ स्थापना, निर्याण प्रसंगी भक्ताला दिलेले आश्वासन वाचताना त्यांचे असामान्यत्व पदोपदी जाणवत राहते. ठिकठिकाणी सद्गुरूंचे त्यांच्या शिष्याशी झालेले संवाद हृद्य व ज्ञानमय आहेत. सद्गुरूंच्या हस्तलिखिताचाही यात समावेश आहे. असे हे जीवनचरित्र म्हणजे त्रिकालज्ञानी, कर्मयोगी, परात्परगुरूंचे व त्याचबरोबर त्यांच्यातल्या अनन्यशरण गुरुभक्ताचे दर्शन आहे.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
रामनगर येथील मठ (गोविंदानंद श्रीराम मंदिर) आणि श्री क्षेत्र नांदिवली येथील मठवास्तुत प्रति गुरुवारी होणाऱ्या आरत्या मानसपूजा/ तारकमंत्रासहित उपयुक्त असणारे हे पुस्तक.
नंदकिशोर संस्कार केंद्र डोंबिवली पूर्व या संस्थेतील बालकांना आणि इतरही मुलांना रोजच्या परिपासाठी अनेक स्तोत्रांनी सजलेले हे पुस्तक. हे पुस्तक लहान मुलांना वाढदिवस भेट किंवा मौजीबंधन भेट म्हणून देण्यास अतिशय उपयुक्त ठरते.