विश्वनाथ मेमोरियल चिल्ड्रेन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेन्टर
मेडिकल रिसर्च सेन्टर आणि चिल्ड्रेन हॉस्पिटल

परमपूज्य सद्गुरू श्री चैतन्यस्वरूप उर्फ सद्गुरू ती. अण्णा व परमपूज्य सद्गुरू श्री लक्ष्मीस्वरूप उर्फ सद्गुरू ती. आई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाने "विश्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट"ची स्थापना केली आहे. लहान मुलांचे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर स्थापन करण्याचा प्रकल्प मंडळाने हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पासाठी डोंबिवली पासून १० कि. मी. अंतरावर शिरढोण येथे बारा एकर जमीन घेतली आहे. ह्या प्लॉटवर लहान मुलांचे ५० बेड्सचे अद्ययावत सुसज्ज हॉस्पिटल बांधण्याची योजना आहेे.



ह्या हॉस्पिटल मध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर असेल , लॅबोरेटरीज, संशोधन केंद्र असेल तसेच डॉक्टर व इतर मेडिकल स्टाफ साठी राहण्याची सोय असेल. हॉस्पिटल प्रकल्पाच्या प्लॉटवर वर्षभर पाण्याची सोय करण्यासाठी एक मोठी विहीर बांधण्यातआली आहे, तसेच कंपाऊंड वॉल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे.

औषधी वनस्पतींची रोपवाटिका आणि वृक्षारोपण :

सद्गुरू ती. अण्णा व सद्गुरू ती. आई ह्यांच्या मार्गदर्शनाखाली काही भक्तांनी इथे वृक्षारोपण करून रोपवाटिका सुरु केली आहे. सद्गुरू ती. अण्णांनी आयुर्वेदिक वनस्पतींना विशेष महत्व दिले आहे. त्यांना असंख्य घरगुती आणि आयुर्वेदिक औषधे माहिती होती व अनेक गरजू रुग्णांना ते ही औषधे सांगत व त्यांचे रोग बरे करत.


काही सेवेकरी भक्तांनी निरनिराळ्या मेडिकल रिसर्च संस्थांमध्ये व कंपन्यांमध्ये जाऊन रोपे व त्याबद्दलची विशेष माहिती मिळवली आहे. ही माहिती व रोपे जतन करण्यात आली आहेत . ह्या रोपांची लागवड व जोपासना करून भविष्यात ही रोपे संशोधन कार्यासाठी हॉस्पिटलच्या प्लॉटवर लावण्याची मंडळाची योजना आहे.

फोटो गॅलरी