गुरुवर्य चैतन्यस्वरूप श्री. भालचंद्र दत्तात्रय लिमये, म्हणजेच आमच्या सर्वांचे अण्णा तसेच लक्ष्मीस्वरूप सुषमा भालचंद्र लिमये म्हणजेच आमच्या सर्वांच्या आई. हे दोघेही श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, गोविंदानंद श्रीराम मंदिर, नंदकिशोर संस्कार केंद्र या तीनही संस्थांचे तसेच श्री स्वामी समर्थ धार्मिक ग्रंथालयाचे व विश्वनाथ मेमोरियल चिल्ड्रेन हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर या नियोजित प्रकल्पाचे आधारस्तंभ. १९७४ साली श्री स्वामी समर्थांच्या चरण स्पर्शित प्रासादिक पादुकांचे ति. अण्णांच्या राहत्या घरी (गणेशकृपा) आगमन झाले व या जागेचे मठात रूपांतर झाले व हजारोंच्या श्रद्धेचे ते श्रद्धास्थान बनले. पादुकांच्या पाठोपाठ आले ते श्री अक्कलकोट स्वामींचे, श्री रघुवीर मुळगांवकर यांनी काढलेले भव्य असे तैलचित्र
एवढे मोठे कार्य करण्यासाठी त्याची योजनाबद्ध आखणी असावी व सरकार दरबारी याची दखल असावी व समाज विश्वास निर्माण व्हावा म्हणून १२ जून १९८४ रोजी श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाची स्थापना केली.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा