१. समाजात मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक जागरूकता आणणे
२. गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत/ शिष्यवृत्ती देणे.
३. समाजात भारतीय संगीताविषयी, आरोग्याविषयी व सामाजिक स्वास्थ्या बद्दल जागरूकता निर्माण करणे.
४. वय वर्षे ३ ते १० या वयोगटातील संस्कारक्षम मुलांसाठी संस्कारवर्ग व विविध उपक्रम - ( श्लोक, स्तोत्रपठण, कथाकथन, व्याख्याने, संगीत, चित्रकला, खेळ इत्यादी शिक्षणातून नंदकिशोरांचा सर्वांगीण विकास ).
५. समाजाला वाचनाभिमुख करण्याच्या हेतूने उत्तम ग्रंथांनी सुसज्ज असे धार्मिक ग्रंथालय.
६. समग्र दृष्टीकोन ठेऊन आखलेला एक भावी उपक्रम :-'विश्वनाथ मेमोरियल चिल्ड्रेन हॉस्पिटल व रिसर्च सेंटर'
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाद्वारे व्यवस्थापित केलेली संस्था: